गारपीट
आल्या पावसाच्या धारा,
सरा मांडला पसारा,
उभं पिक रानामधी,
गेल्या नासवून गारा.
झाला फुलाले अघात,
समधि गळाली रे पानं
पाणी पाणी चोहीकडे
तरी जळाली रे मनं
काही माणूस भी गेले
काही तुटले छप्पर
कुठे जीवाच्या भयाने
पार हंबरती गुर
कुठे गहू कुठे कांदा
कुठे दाळिंब अंगूर
कुठे गळा लागे फास
खेळ नियतीचा क्रूर
ऐक माझ्या देवा
माझं एकच गाऱ्हाणे
इडा पिडा हि जाऊदे
एवढ एकच मागणे
नको हिरे मोती
हवी कष्टाची पावती
सुखी ठेव बळीराजा
सुखी ठेव काळी माती ….
--अविनाश
superb kavita mitraa.... kharach jabardast lihilis.. eka shetkaryachya hathani ani tyachya manani lihileli hi kavita..
ReplyDeleteHappiness & sadness in one package.... Salute to composition boss...
ReplyDelete