राजकुमार
।। राजकुमार ।।
सुंदर रातीला
सुंदर पहाटे
सुंदर झाली सकाळ ,
सुंदर राज्यात
सुंदर राजाचा
सुंदर राजकुमार .
अल्लड वाऱ्याची
अल्लड झुळुक
अल्लड ही सायंकाळ,
अल्लड चालणे
अल्लड बोलणे
अल्लड त्याचा रुबाब.
रंगीत फुलाची
रंगीत पाकळी
रंगीत आला सुवास,
रंगीत मनात
रंगीत विचार
रंगीत त्याचा अभास.
भन्नाट गाण्याच
भन्नाट संगीत
भन्नाट सूर ताल,
भन्नाट देशात
भन्नाट राणीचा
भन्नाट राजकुमार…।
--अविनाश काळे
Nicely portray....
ReplyDeleteThank You!
Delete